पुणे : पुणे शहरात सध्या करोना विषाणूने चांगलाच हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे, प्रशासनाकडून विषाणू रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. दरम्यान, यासर्वात जे बेघर आहेत त्यांचे हाल होत आहेत. अशाच बेघर असणाऱ्यांना पुणे पालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे.
८५९ बेघरांना निवारा !#पुणे शहरातील #बेघर व्यक्तींच्या निवाऱ्याची जबाबदारी आपण महापालिकेच्या माध्यमातून घेतील असून आतापर्यंत ८५९ नागरिकांची राहण्याची सोय शहराच्या विविध भागातील ११ ठिकाणी करण्यात आली आहे. pic.twitter.com/AYwjNPcTOV
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 29, 2020
शहरातील बेघर व्यक्तींच्या निवाऱ्याची जबाबदारी पुणे महानगरपालिकेने घेतली आहे. याविषयी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली. आपण महापालिकेच्या माध्यमातून शहरातील बेघरांची जबाबदारी घेतील असून आतापर्यंत ८५९ नागरिकांची राहण्याची सोय करण्यात आली असल्याचे मोहोळ यांनी म्हटले. तसेच या सर्वांची शहराच्या विविध भागातील ११ ठिकाणी राहण्याची सोया करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.