कोरोना लसीकरणात आणखी एक महत्त्वाचा टप्पा

नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. पण आणखीही रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी भारतामध्ये कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी देण्यात आली. ज्या धर्तीवर आता टप्प्या-टप्प्याने ही लस देशातील नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. यातच आता या लसीकरणादरम्यान आणखी एक महत्वाचा टप्पा आला आहे.

मंगळवारी केंद्राकडून ही बाब स्पष्ट करण्यात आली, 6 साथीदार राष्ट्रांना 20 जानेवारीपासून कोरोना लसीचा पुरवठा देशाकडून केला जाणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंदर्भातील माहिती अधिकृत पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली. त्यांना काही शेजारी आणि मित्र राष्ट्रांकडून लसीचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘इतर राष्ट्रांकडून करण्यात आलेली विनंती आणि लस निर्मितीमध्ये भारताची असणारी कटीबद्धता, वितरण क्षमता यांच्या बळावर कोरोनाशी लढणाऱ्या मानवतेला सहकार्य करण्यासाठी म्हणून इथे लसींचा पुरवठा 20 जानेवारीपासून करण्यात येणार आहे’, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली. शिवाय श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मॉरिशस या राष्ट्रांकडून भारत अधिकृत परवानगीच्या प्रतिक्षेत असल्याचेही सांगण्यात आले.

मित्र राष्ट्रांना देशातील लसींची गरज लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने लसींचा पुरवठा केला जाणार आहे, ही बाबही यावेळी स्पष्ट करण्यात आली. यापूर्वीही कोरोना काळात देशाकडून हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन, रेमडेसिवीर आणि पॅरासिटामोल, मास्क, ग्लोव्ह्ज, व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय साहित्याचाही पुरवठा मित्र राष्ट्रांना करण्यात आला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.