वॉशिंग्टन – लवकरच करोनासारखी आणखी एक साथ जगात येऊ शकते, असा इशारा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी दिला आहे.
कोविड-19 पासून गंभीर आजारी पडण्याचा धोका नाट्यमयरित्या कमी झाला आहे. कारण लोकांमध्ये या व्हायरसविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित होत असल्याने हे घडत आहे, असे त्यांनी सांगितले.
बिल गेट्स यांनी एका वृत्तसंस् मुलाखत दिली. आगामी काळात महामारी ही करोना व्हायरसच्या प्रकारातील एका वेगळ्या व्हायरसपासून येऊ शकते. मात्र, वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीच्या मदतीने जग अधिक चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मात्र, त्यासाठी आतापासूनच गुंतवणूक करावी लागेल, असेही ते म्हणाले. करोना गेल्या दोन वर्षांपासून आपल्यामध्ये आहे आणि त्याचा वाईट परिणाम आता कमी होत आहे, असे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक म्हणाले.
जागतिक लोकसंख्येमध्ये प्रतिकारशक्तीची पातळी काही प्रमाणातच निर्माण झाल्यामुळे हे घडत आहे. नवीन ओमिक्रॉन वेरियंटमुळे व्हायरसची तीव्रताही आता कमी झाल्याचे दिसून आले आहे. व्हायरस पसरतो तेव्हा तो स्वतःची प्रतिकारशक्ती निर्माण करतो. पण आता जागतिक समुदायाची व्हायरसविरोधातील प्रतिकारशक्ती वाढल्याने ही सवय लसीपेक्षा अधिक प्रभावी ठरली आहे, असे गेट्स म्हणाले.