मुंबई – पुणे जिल्ह्यात होणारा लाखो तरूणांना नोकरी देणारा वेदांता-फाॅक्सकाॅन हा हजारो कोटींचा प्रकल्प ऐनवेळी गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण तापले होते. शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार टीका होत होती. त्यानंतर आता आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 22 हजार कोटींचा हा प्रकल्प नागपूरला होणार असल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते. मात्र आता तो प्रकल्प गुजरातला गेला असून या प्रकल्पाचं उद्धाटन 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.
कृषीमंत्री सत्तारांनी अधिकाऱ्याला विचारलं दारू पिता का? अधिकारी म्हणाले, कधी कधी थोडी…, व्हिडीओची जोरदार चर्चा https://t.co/h1bq0mADg9
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 27, 2022
सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने सप्टेंबर 2021 मध्ये स्पेनच्या मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए. कडून 56 सी-295एमडब्लू वाहतूक विमान खरेदी करण्यास मान्यता दिली होती. संरक्षण मंत्रालयाने 24 सप्टेंबर 2021 रोजी करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर नवी दिल्लीत 27 ऑक्टोबर 2022 रोजी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार म्हणाले की, कराराअंतर्गत 16 विमाने उड्डाणासाठी सज्ज अशा स्थितीत वितरित केली जातील आणि 40 विमाने भारतीय विमान कंत्राटदार, टाटा समूह, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (टीएएसएल) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), टीएएसएलच्या नेतृत्वाखाली भारतात तयार करेल. लष्करी विमानाची निर्मिती खासगी कंपनीद्वारे केली जाणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 21,935 कोटी रुपये आहे. या विमानाचा वापर नागरी उद्देशांसाठीही केला जाऊ शकतो.
‘उद्धव साहेबांनी फक्त तुमच्यासाठी आम्हाला इथं पाठवलंय’; आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर https://t.co/kozQ56yt2h
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 27, 2022
दरम्यान, ‘मेक इन इंडिया’ आणि देशांतर्गत विमान निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमधील वडोदरामध्ये भारतीय हवाई दलासाठी (आयएएफ) वाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानाच्या निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम शिंदे आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
C-295 transport aircraft for the Indian Air Force to be manufactured by Tata-Airbus at Vadodara in Gujarat: Defence Officials pic.twitter.com/0txKqTlDIX
— ANI (@ANI) October 27, 2022
दरम्यान, वेदांता-फाॅक्सकाॅन नंतर आता आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. अगोदरच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार केंद्राला समर्पित असल्याची टीका विरोधक सातत्याने करत असल्याचे पाहायला मिळते. त्यानंतर आता एकामागून एक मोठे प्रकल्प राज्यातून गुजरातला जात आहे. वेदांता नंतर आता लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प गुजरातला गेल्याने लाखो तरूण या प्रकल्पामुळे मिळणाऱ्या रोजगारापासून वंचित राहणार आहेत.