मुंबई – देशातील चलनी नोटांवरील फोटोवरून सध्या राजकारण जोरात सुरु असल्याचे दिसत आहे. सर्वात आधी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो असावा, अशी मागणी केली. याचे पडसाद देशभरासह राज्यातही उमटत आहेत.
भाजप आमदार नितेश राणे यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असावा म्हंटले आहे. त्यांनी महाराजांचा फोटो असलेली एक नोट ट्विटरवर शेअर केली. ये परफेक्ट है, असं कॅप्शनही त्यांनी फोटोला दिलं. त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी नोटेवर गौतम बुद्धांचा फोटो असावा अशी मागणी केली.
कृषीमंत्री सत्तारांनी अधिकाऱ्याला विचारलं दारू पिता का? अधिकारी म्हणाले, कधी कधी थोडी…, व्हिडीओची जोरदार चर्चा
सविस्तर बातमी….. @sachin_inc
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻https://t.co/h1bq0mADg9 pic.twitter.com/Je6zvL0wdK— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 27, 2022
तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील नेते आणि आमदार अनिल परब यांनी नोटांवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असावा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अखंड भारत.. नया भारत.. महान भारत..
जय श्रीराम .. जय मातादी ! pic.twitter.com/OPrNRu2psl
— Ram Kadam (@ramkadam) October 27, 2022
अनिल परब म्हणाले की, ‘शिवसेनेने कोणतीही अधिकृत मागणी केलेली नाही. शिवसेना गरिबांचा पक्ष आहे, त्यामुळे नोटांच्या राजकारणात या भानगडींमध्ये शिवसेना जात नाही. पण कुणाचा फोटो असायला पाहिजे, असं विचाराल तर बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे, असं मी सांगेन. माझा नेता असावा असं प्रत्येकाला वाटत असेल, तर मी शिवसेनेचा आहे. मला असं वाटतं बाळासाहेबांचा असायला पाहिजे, पण माझ्या वाटण्याला काहीही महत्त्व नाही. नोटेवर कुणाचा फोटो असायला पाहिजे, हे सरकार ठरवतं. हे जाणून बुजून निर्माण केलेले वाद आहेत,’ असं अनिल परब म्हणाले.
Ye perfect hai ! 😊 pic.twitter.com/GH6EMkYeSN
— nitesh rane (@NiteshNRane) October 26, 2022
दरम्यान, परब यांच्या वक्तव्यावर भाजप नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेबांचा फोटो नोटेवर असावा, ही सगळ्यांचीच मनोमन इच्छा आहे, पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांनी अशी मागणी करण्याचा नैतिक अधिकार काय आहे? काँग्रेससोबत कधीही जाणार नाही, तशी वेळ आली तर पक्ष बंद करेन, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. पण तुम्ही बाळासाहेबांचं वचन मोडलत, अशी टीका राम कदम यांनी केली.
दरम्यान, नोटांवरील फोटोवरून देशभरात राजकारण सुरु आहे, अनेक नेते आपआपली मते मांडत आहेत. मात्र या मतांचा विचार करून नोटांवरील फोटोत बदल करण्यात येईल का हे पाहणे महत्वाचे आहे.