सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात गुरुवारी (दि. 30) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार 64 नागरिक करोनाबाधित झाले असून, गेल्या 24 तासांमध्ये एका बाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात गोडोली दोन, शनिवार पेठ, शाहूनगर, जगतापवाडी, देशमुख कॉलनी, सुतार कॉलनी प्रत्येकी एक, इतरत्र पाच, खोजेवाडी, जकातवाडी, कोडोली प्रत्येकी एक, फलटण तालुक्यात मलवडी एक,
वाई तालुक्यात वाई शहरातील सोनगीरवाडी, रविवार पेठ प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात वडूज आठ, मांडवे चार, येरळवाडी, पळसगाव प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात सासुर्वे 3, सुर्ली, साप, कडेगाव प्रत्येकी दोन, कोरेगाव, आर्वी, पिंपरी, रहिमतपूर, ल्हासुर्णे, एकंबे प्रत्येकी एक,
खंडाळा तालुक्यात शिरवळ दोन, बावकलवाडी, अहिरे प्रत्येकी एक, जावळी तालुक्यात कुडाळ एक, पाटण तालुक्यात मारुल दोन, कढणे, विढणी प्रत्येकी एक,
महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर दोन, पाचगणी एक, दरम्यान, जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना नायकाचीवाडी, ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुषा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळींची संख्या 1817 व बाधितांची एकूण संख्या 56 हजार 442 झाली आहे.