“स्वतःचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला अन् चित्र ताई विचारत आहेत नवा वसुली मंत्री कोण?”

चित्र वाघ यांच्या टीकेला रुपाली चाकणकर यांचे उत्तर

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर देशमुख यांनी काल राजीनामा दिला. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजप नेत्या चित्र वाघ यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांच्या याच टीकेला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिले आहे. चित्राताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण??, अशा शब्दात वाघ यांच्यावर पलटवार केला आहे.

रुपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्ट करुन चित्रा वाघ यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर नवा वसुली मंत्री कोण?, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला होता. त्यांच्या याच प्रश्नाला चाकणकर यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. “चित्रा ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आणि ताई विचारतायत नवा वसुली मंत्री कोण?, चित्रा ताई भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत’ हे म्हणायची वेळ येईल, असा सल्ला देताना थोडा धीरज रखो , सब सच सामने आयेगा.!!”, असा गर्भित इशाराही चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसूली मंत्री कोण? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. तसेच एखादा चेहरा बदलल्याने महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली.

“ताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण??अहो ताई भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत’ हे म्हणायची वेळ येईल.थोडा धीरज रखो , सब सच सामने आयेगा.!!”

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.