पिंपरी – चार दिवसांपासून “करोना’चे आकडे सातत्याने वाढत आहेत. बुधवारी देखील शहरातील 22 आणि शहराबाहेरील परंतु महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असलेल्या 4 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच 21 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आले.
बुधवारी सायंकाळी हाती आलेल्या अहवालानुसार शहरातील 12 पुरुष व 10 स्त्रियांना “करोना’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर शहराबाहेरील 4 पुरुषांनाही “करोना’ची बाधा झाली आहे. बुधवारी आढळलेले रुग्ण हे चऱ्होली, भाटनगर, किवळे, निगडी, पिंपळे गुरव, सांगवी, आनंदनगर (चिंचवड स्टेशन), बौद्धनगर, काळेवाडी फाटा, बोपखेल, आंबेगाव येथील रहिवासी आहेत. तसेच करोनामुक्त झालेले 21 रुग्ण संभाजीनगर, रुपीनगर, आनंदनगर, रहाटणी, चिखली, कसबापेठ, बोपोडी येथील रहिवासी आहेत.