बॉलीवूडमधील मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने आपले वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या 75 व्या वाढदिवशी सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये रितेश आपल्या वडिलांच्या जॅकेटवर हात ठेवलेला दिसत आहे. तसेच रितेश देशमुख त्यांच्या कुर्त्याला मिठी मारताना खुपच भावूक झाल्याचे दिसतो.
रितेशने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा … मला दररोज तुमची आठवण येते!!’. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वजण खूपच भावूक होत आहेत. यावर अनेक चाहत्यांनी कॉमेंट करत लाखोंच्या संख्येने लाईक केले आहे.
दुसरीकडे जेनिलिया डिसूझानेही तिच्या सासऱ्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये जेनिलियाने म्हणते, रायनच्या शिक्षकाने त्याला विचारले की तुला कोणत्या गोष्टीचा सर्वात जास्त अभिमान आहे.
यावर तो म्हणाला, माझे आजोबा. आम्हाला नेहमीच तुमची आठवण येत असते आणि आम्हाला माहीत आहे की, आपण जिथे आहात तिथून आम्हाला पाहात आहात. आपण आमच्या मनात आहात आणि आम्ही दररोज आम्हाला तुमची जाणीव होते. हॅप्पी बर्थडे पप्पा.’