सातारा -जिल्ह्यात रविवारी (दि. 4) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असली तरी करोनामुळे रोजच बळी जात असल्याने परिस्थिती चिंताजनकच आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात आणखी 17 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सोमवारी दिली.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरू असताना सातारा येथील 77 वर्षीय महिला, बोरगाव, ता. सातारा येथील 80 वर्षीय महिला, आरफळ, ता. सातारा येथील 60 वर्षीय महिला, नागठाणे, ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, केसरकर पेठ, सातारा येथील 86 वर्षीय पुरुष, शाहूपुरी, ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, निझरे, ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला.
जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना पुजारी कॉलनी, फलटण येथील 63 वर्षीय पुरुष, कराडमधील 70 व 65 वर्षीय पुरुष, सदरबझार, सातारा येथील 65 वर्षीय महिला, कोळकी, ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष, कोपर्डे हवेली, ता. कराड येथील 60 वर्षीय महिला, निवळे, ता. पाटण येथील 78 वर्षीय महिला, जाधववाडी, ता. फलटण येथील 46 वर्षीय महिला, मुंजवडी, ता. फलटण येथील 85 वर्षीय पुरुष, साताऱ्यातील 83 वर्षीय पुरुष, अशा 17 कोविडबाधितांचा मृत्यू झाला.
661 नागरिकांना दिला डिस्चार्ज
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून आणि करोना केअर सेंटरमधून सोमवारी संध्याकाळपर्यंत 661 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. तर 628 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 47, कराड 16, फलटण उपजिल्हा रुग्णालय 20, कोरेगाव 77, वाई 40, खंडाळा 74, रायगाव 68, पानमळेवाडी 49, मायणी 16, महाबळेश्वर 10, दहिवडी 27, म्हसवड 25, तळमावले 35 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 124 अशा एकूण 628 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.