सातारा -बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या अध्यक्षपदी सातारा जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. वसंतराव एकनाथ भोसले यांची एकमताने निवड झाली आहे. सातारा जिल्ह्याला हा बहुमान प्रथमच मिळाला असून ऍड. भोसले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वेळू, ता. कोरेगाव या छोट्याशा गावातून आलेल्या ऍड. भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये गेल्या 32 वर्षांपासून दिवाणी व फौजदारी क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी 2004-05 मध्ये जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष तर 2011-12 मध्ये अध्यक्षपदी काम केले होते.
पाणी फौंडेशनचा वॉटर कप वेळू गावास 2016-17 मध्ये मिळवून देण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या मार्च 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. या पदावर ऍड. भोसले यांनी उत्कृष्ट काम केले. त्याची पावती म्हणून औरंगावाद येथे झालेल्या संघटनेच्या सर्वसाधारण सभेत त्यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सहकार, पणन व जिल्ह्याचे पालकमंत्री वाळासाहेब पाटील, विधान परिषदेचे सभापती
रामराजे नाईक निवाळकर, खा. उदयनराजे भोसले, खा. श्रीनिवास पाटील, खा. सुप्रिया सुळे, आ. शिवेंदसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. महेश शिंदे, आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार मदन भोसले, नरेंद्र अण्णासाहेब पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सातारचे नगरसेवक अशोक मोने, रहिमतपूरचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, जिल्हा वार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. अरुण खोत, जिल्हा विधी ग्रंथालयाचे अध्यक्ष ऍड. नितीन मुके,
ऍड. डी. एम. जगताप, ऍड. डी. आय. एस. मुल्ला, ऍड. काका पाटणकर, ऍड. डी. एस. पाटील, ऍड. नितीन वाडीकर, ऍड. शिवाजीराव मर्ढेकर, ऍड. डी. एम. चव्हाण, ऍड. उत्तमराव गोळे, ऍड. सयाजीराव घाडगे, ऍड. जे. व्ही. यादव, ऍड. श्याम बेगमपुरे, ऍड. व्ही. आर. बडदरे, ऍड. एस. एम. साखरे, ऍड. विजय कारंडे, ऍड. सुधीर गोवेकर, ऍड. प्रमोद शिंदे, ऍड. महेंद्र माने, ऍड. अजय डांगे, ऍड. अमरसिंह भोसले व मान्यवरांनी ऍड. वसंतराव भोसले यांचे अभिनंदन केले.