सातारा – महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असल्याचे प्रशासनाने कळवले आहे. दि. 21 मे रोजी सायं.6 वाजता राजभवन महाबळेश्वर येथे आगमन होणार असून दि. 22 मे रोजी दुपारी 3 वाजता राजभवन महाबळेश्वर येथे इंडियन रेडक्रॉस सोसायटी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
दुपारी 3.30 वाजता जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असून दुपारी 4.30 वाजता ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे आगमनानंत ते रुग्णालयाची पहाणी करणार आहेत. सायंकाळी 5.10 राजभवन येथे आगमन व राखीव.
दि. 23 मे रोजी सकाळी 10.15 वाजता श्रीक्षेत्र महाबळेश्वर मंदिराला भेट देणार असून दर्शन, पूजा करणार आहेत. 11.15 वाजता राजभवन येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ अधिकाऱ्यांशी बैठक. दुपारी 3.30 वाजता स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत.
दि. 24 मे रोजी दुपारी 2.30 वाजता मधाचे गाव मांघर, ता. महाबळेश्वर येथे भेट देणार असून पहाणीनंतर दुपारी 3.10 वाजता राजभवाकडे मोटारीने प्रयाण होणार आहे दि. 25 मे रोजी दुपारी 12 वाजता राजभवन येथून मोटारीने पाचगणीकडे प्रयाण करणार असून 12.30 वाजता न्यु ईरा हायस्कूल पाचगणी येथे भेटीनंतर हेलीकॉप्टरने राजभवन मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.