- 6 रुग्णांचा मृत्यू : 151 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज नवीन 136 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 6 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरामध्ये 93647 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, मंगळवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरातील 132 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 4 रुग्णांना करोनाची लागण झाली. आज दिवसभरात 6 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 3 व शहराबाहेरील 3 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत 2359 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1671 तर शहराबाहेरील 688 रुग्णांचा समावेश आहे. आज शहरातील संत तुकारामनगर पिंपरी, दापोडी, काळेवाडी येथील 3 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील हडपसर, जुन्नर व धोलवड येथील 3 जणांचा मृत्यू झाला.
दिवसभरात 151 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 89898 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2906 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 822 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.