सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 116 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर 3 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्यांमध्ये गोळेश्वर (ता. कराड) येथील 58 वर्षीय पुरुष, सोनवडी (ता. फलटण) येथील 78 वर्षीय पुरुष, शिवथर (ता. सातारा) येथील 80 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
एकूण नमुने – 257138
एकूण बाधित – 52063
घरी सोडण्यात आलेले – 49579
मृत्यू – 1744
उपचारार्थ रुग्ण – 740