मुंबई – बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता इरफान खान यांची कलाकारांची फॅन फॉलोइंग खूप मोठी असून बॉलिवूडमधील बड्या सिताऱ्यांच्या अकस्मात निधनाने बॉलिवूड आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर या दोन्ही स्टार्सच्या मृत्यूबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. मात्र, दिवंगत कलाकार इरफान खान आणि श्रीदेवी यांच्या मृत्युची खिल्ली उडवल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.
Shame on everyone who keeps hiring him, shame on everyone who keeps cheering him on, shame on everyone in the audience who clapped pic.twitter.com/A2Qk8DUkeH
— Hassan Choudary (@hassanchoudary) May 1, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी टेलिव्हिजन विश्वात दाखवल्या जाणाऱ्या एका टीव्ही शोमध्ये पाकिस्तानी अभिनेता अदनान सिद्दिकी सहभागी झाला होता. शो सुरू असताना त्या शोचा सूत्रसंचालक आमिर लियाकत याने अदनानसमोर त्याच्या चित्रपटांविषयी बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला की, तू (अदनान) मॉम या चित्रपटात काम केलंस, त्यानंतर श्रीदेवी यांचं निधन झालं. तू इरफान खानसोबत काम केलंस, त्यानंतर त्यांचंही निधन झालं. आता तुला मर्दानी 2 ची ऑफर आली होती. पण, बरं झालं तू यात काम केलं नाहीस, असं वक्तव्य आमिर लियाकत याने केलं.
अदनान याने त्यावर त्यांच्या मृत्युबाबत खेद व्यक्त केला होता.हे विधान अतिशय घृणास्पद असून आमिर लियाकत याला माध्यमांमधून त्वरित हाकलण्यात यावं, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आमिर याच्या विधानावर संताप व्यक्त केला. दुसरीकडे अदनान सिद्दिकी याने शोमध्ये आणि नंतरही पोस्ट करून झालेल्या प्रकाराबाबत प्रेक्षकांची माफी मागितली आहे.