कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील कागल इथं मावशीच्या घरी राहण्यासाठी आलेल्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर मावसभावाने अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी मुलीस त्रास होवू लागल्यानंतर ती तीन महिन्याची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. याबाबतचा गुन्हा कागल पोलिसात दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी 21 वर्षीय मावसभावाला पोलिसांनी अटक केली आहे.
अल्पवयीन मुलगी ही आपल्या मावशीकडे राहण्यास आली होती.संशयिताने दिनांक 30 जून 2021 ते 2 जुलै 2021 दरम्यान तिच्यावर अत्याचार केला. यानंतर संशयिताने तिला याबद्दल कोणाला काही सांगू नकोस अशी धमकी दिली.यानंतर काही दिवसांनी अल्पवयीन मुलीस त्रास सुरू झाल्यावर आईने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरकडे उपचारासाठी नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मुलगी गरोदर असल्याचे सांगितले.
यानंतर कागल पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तात्काळ मुलगीकडे अधिक चौकशी केली मात्र, संबंधित मुलीने घाबरून याबाबतची कोणतीही माहिती सांगितलेली नाही. यामुळे कोल्हापूर येथील बाल कल्याण समितीतील कन्या निरीक्षण गृह येथे संबंधित मुलगीला 1 सप्टेंबर 2021 रोजीपर्यंत दाखल करण्यात आले आहे.