Ankita Lokhande Divorce – बिग बॉस 17 च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये पुन्हा एकदा विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यात मोठा वाद पाहायला मिळाला. हे भांडण विकी आणि आयशा खान यांच्यातील चर्चेतून सुरू झाले, जिथे दोघेही लग्नाची खिल्ली उडवत होते.
जेव्हा विकी जैनने आयशाला सांगितले की,’विवाहितांना खूप समस्यांना सामोरे जावे लागते’, तेव्हा त्याचे हे बोलणे ऐकून अंकिता लोखंडेला राग आला. अंकिताने विकीला विचारले की, त्याला घटस्फोट घ्यायचा आहे का? विकी आणि अंकिताला छोट्याशा मुद्द्यावरून असे भांडताना पाहून आयशा थक्क झाली.
दरम्यान, आयेशा खान, मुनव्वर फारुकी, विकी जैन आणि अंकिता लोखंडे बिग बॉसच्या घराच्या बागेत एकमेकांशी बोलत होते. आयशाने विकीला वैवाहिक जीवनाविषयी प्रश्न विचारले तेव्हा विकीने गमतीने सांगितले की, विवाहित पुरुष कधीच सांगू शकत नाहीत की त्यांना किती वेदना सहन कराव्या लागतात. विकीचे बोलणे ऐकून आयशा म्हणाली की ती कधीच लग्न करणार नाही.. काही वेळाने अंकिताने विकीला विचारले की,’तू आयशासोबत असे का बोलत आहेस? त्यानंतर अंकिताच्या प्रश्नाला उत्तर देताना विकीने सांगितले की, मला कसे वाटते हे मी कधीच सांगू शकत नाही. विवाहित लोक, विशेषत: पुरुष अशाच परिस्थितीतून जातात.”
विकीचे बोलणे ऐकून अंकिताने त्याच्या बोलण्याला चोख प्रत्युत्तर दिले आणि म्हणाली, ‘तू एवढ्या अडचणीत आहेस तर माझ्यासोबत का आहेस? चल, घटस्फोट घे, मला तुझ्यासोबत घरी परतायचं नाही.” मात्र, हे सगळं सांगताना अंकिता अजिबात गंभीर दिसत नव्हती. आता सोशलवर या एपिसोडची क्लिप व्हायरल होत आहे. यावरून या जोडप्याचे फॅन्स नाराजी व्यक्त करत आहे.
============================