Tripti Dimri – अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर स्टारर ‘अॅनिमल’ (Animal) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता पर्यंत ‘ॲनिमल’ चित्रपटाने ( Animal ) तब्बल 660.89 कोटींचा टप्पा ओलांडला असून, आगामी काळात देखील कामाईच्या आकड्यात मोठी भर होणार असल्याचं बोललं जात आहे. ‘ॲनिमल’ यावर्षातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा ओपनिंग चित्रपट बनला आहे.
या सिनेमात रणबीर कपूर आणि रश्मिकाची केमिस्ट्री आणि रोमँटिक सीन लोकांना खूप आवडले. त्याचबरोबर अभिनेत्याचा तृप्ती डिमरी (Tripti Dimri) सोबतचा इंटिमेट सीनही चर्चेत आला आहे. यामध्ये तृप्ती रणबीरसोबत अतिशय बोल्ड सीन्स देऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, तृप्तीचे (Tripti Dimri) हे सीन्स सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होत असून, या सिनेमासाठी निर्मात्यांना अभिनेत्रीला तब्बल 40 लाख रुपये मानधन द्यावे लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘ॲनिमल’ सिनेमासाठी अभिनेता रणबीर कपूर याने 35 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. तर तृप्ती हिने 40 लाख रुपये मानधन घेतलं असल्याची माहिती मिळत आहे. ‘ॲनिमल’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका रात्रीत तृप्ती हिला नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाली आहे.
तृप्ती डिमरीच्या बॉलिवूड प्रवासाबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेत्री गेल्या 6 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तिने 2017 मध्ये ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. याशिवाय तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तिच्या अभिनय कौशल्याचा प्रसार केला आहे. अभिनेत्रीने नेटफ्लिक्सच्या ‘काला’, ‘बुलबुल’ आणि ‘लैला मजनू’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.