मुंबई – गतवर्षी विवाहबंधनात अडकलेले आनंद आहूजा आणि बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर हे आपल्या लग्नानंतरचे जीवन इंजॉय करताना दिसून येत आहे. या दोघांचे लवी-डवी फोटो किंवा व्हिडिओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
यातच सोनम काही दिवसांपूर्वीच लंडनवरुन भारतात परतली आहे. सोनमनं याबाबतचा व्हिडियो शेअर केलेल्या असून या व्हिडियोमध्ये सध्या होम क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती दिली होती. तसेच ती आणि तिचा नवरा कोरोनापासून सुरक्षित असल्याचंही तिनं म्हटलं होतं.
मात्र आता सोनम प्रेग्नन्ट असून अनिल कपूर लवकरच आजोबा होणार असल्याचं बोललं जात आहे. सोनम कपूरचे असे काही फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत त्यावरुन सोनम प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा होत आहे. मात्र सोनमनं याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मिळलेल्या माहितीनुसार, सोनम कपूरचे असे काही फोटो समोर आले आहेत ज्यात तिचा बेबी बंप दिसत असल्याचं बोललं जात आहे.
या फोटोंमध्ये सोनम व्हाइट कलरच्या नाइट वेअरमध्ये दिसत आहे. हे फोटो पाहिल्यावर सोनम प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.सोनम कपूर मागच्या काही दिवसांपासून कोणत्याही पब्लिक इव्हेंटमध्ये दिसलेली नाही. याशिवाय ती सोशल मीडियापासूनही दूर आहे. त्यामुळे सोनमच्या प्रेग्नन्सीच्या शक्यता आहेत.