Anil Kapoor Nayak 2 Movie| बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांचा 2001 साली प्रदर्शित झालेला ‘नायक’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आजही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. या चित्रपटाची कथा, अनिल कपूर यांच्यासह इतर कलाकारांच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. अशातच 23 वर्षांनंतर आता नायक चित्रपटाचा सीक्वेल येत आहे.
पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आनंद आणि ममता आनंद यांच्या मार्फिक्स पिक्चर्सच्या बॅनरखाली ‘नायक 2’ चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे आहेत. तर मिलन लुथरिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. पण अद्याप चित्रपटामधील कलाकारांची कास्टिंग सुरू आहे. मिलनबद्दल सांगायचे तर, त्याने ‘कच्चे धागे’, ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ सारखे चित्रपट केले आहेत. लेखक रजत अरोरा ‘नायक 2’साठी मिलनसोबत काम करणार आहे.
अनिल कपूर CMच्या भूमिकेत दिसणार का?
अनिल कपूरने साकारलेली ‘नायक’मधील व्यक्तिरेखा आजही लोकांच्या मनात ताजी आहे. मात्र, 23 वर्षांनंतर या सिक्वेलचे काम सुरू होत आहे. ‘नायक 2’ ची कथा कल्पनेवर आधारित नवीन कथा असेल आणि नायक राजकीय व्यवस्थेला आव्हान देण्याची शक्यता जास्त आहे. मात्र या सिनेमातील कलाकरांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला नसून यात पुन्हा अनिल कपूर दिसणार का? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. Anil Kapoor Nayak 2 Movie|
दरम्यान, ‘नायक: द रियल हिरो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन एस शंकर यांनी केले होते. तर एएम रत्नम हे या चित्रपटाचे निर्माता होते. या चित्रपटामध्ये अनिल कपूर, राणी मुखर्जी, अमरीश पुरी, परेश रावल, जॉनी लीव्हर आणि शिवाजी साटम हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत होते. आजही त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर आता ‘नायक 2’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा:
‘रणदीपची जादूची चालली नाही’ जाणून घ्या, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाची पहिल्या दिवसाची ‘कमाई’