पुणे- वाहन उद्योगाच्या वाढीला ब्रेक बसल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक लघू उद्योगाला फटका बसला आहे. या परिसरातील 14 हजार लघू उद्योगाच्या अस्तित्वाला घोका निर्माण झाला आहे.
या सगळ्या लघू उद्योगांमध्ये किमान 5 लाख कर्मचारी काम करतात. मात्र याच कंपनीचं भविष्य धोक्यात असल्या कारणाने कर्मचारी कपात करण्याची वेळ कंपनीवर येऊ शकते.
दरम्यान, टाटा मोटर्स, बजाज, फोक्सवॅगन, मर्सिडीज बेन्झ, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांच्या प्रकल्पांमध्येही या लघु उद्योगांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यामुळे या कंपनींनाही मंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे.