…अन्‌ वाहतूक पोलीस जागे झाले!

दैनिक “प्रभात’मध्ये वृत्त प्रकाशित होताच सातारा रस्त्यावर बेशिस्त वाहनांवर धडक कारवाई

धनकवडी – पुणे-सातारा रस्त्यावरील डी-मार्ट ते वाळवेकरनगर मार्गादरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीवर दैनिक “प्रभात’ने बुधवारच्या अंकात प्रकाश टाकत तेथील वस्तूस्थिती मांडली. याची गंभीर दखल घेत पोलिसांच्या वाहतूक विभागाने बुधवारी दणक्‍यात कारवाई केली. येथे नो पार्किंगधील रिक्षा, कार तसेच दुचाकी यांना थांबू देण्यात आले नाही. यामुळे मुख्य रस्त्याने वाहतूक कोंडीतून मोकळा श्‍वास घेतल्याचे दिसून आले.

स्वारगेट-सातारा रस्त्यावर “दुकानांमुळे वाहतूक कों”डी’मार्ट’ असे वृत्त मंगळवारी प्रसिद्ध झाले होते. परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांनी वृत्ताचे कौतुक केले. त्यांना दररोज सतावणाऱ्या विषयाला वाचा फोडली गेल्याने नागरिकांनी “प्रभात’चे आभार मानले.

वाहतूक शाखेनेही नियमित होणारी कारवाई आणखी गतिमान केली. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी बुधवारी टळल्याचे दिसून आले. दरम्यान, या परिसरात अशा कारवाईची सातत्याने आवश्‍यकता आहे, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्‍त केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.