मुंबई – अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या ‘मूविंग इन विद मलाइका’ या शोमुळे खूपच चर्चेत आहे. मलायकाला नेहमीच हटके काहीतरी करण्याची सवय आहे. फिटनेस असो वा जिम मलायका नेहमी आपला वेगळा रुबाब सर्वांना दाखवून देत असते. नव्या शोमध्ये देखील मलायका काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत आहे. शोच्या पुढील भागात चित्रपट निर्माता करण जोहर हा तिचा गेस्ट म्हणून येणार आहे. या एपिसोडचा प्रोमो देखील मलायकाने शेअर केला आहे.
कारण जोहर तिच्या शो वर येतो आणि मलायका त्याचे स्वागत करते. परंतु करणलाही शो होस्टिंगची सवय असल्यामुळे तो थेट मलायकालाच प्रश्न विचारायला सुरुवात करतो. करण जोहर मलायकाला यावेळी विचारतो,”यावेळी तुझ्या प्रेमात कोण पडलय ? तुम्ही लग्न कधी करणार आहात ? यावर मलायका त्याला उत्तर देताना म्हणते,हा सोफा माझा आहे तुझा नाही.. ओके बाय. असं म्ह्णून मलायका वेळ मारून नेताना दिसते.
View this post on Instagram
या शो दरम्यान मलायका आणि करण यांच्यामध्ये विविध विषयांवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. दोघेही शो दरम्यान खूपच मस्ती करताना दिसतात. प्रोमोमध्ये तर मलायका थेट करणच्या मांडीवर जाऊन बसलेली पाहायला मिळते. हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मलायकाचा हा शो सुरु आहे. करण आणि मलायकामध्ये आणखी काय काय गमती जमती होतात हे या शोच्या पूर्ण भागातच पाहायला मिळेल.