…आणि प्रवाशांसह लोकल थेट कारशेडमध्ये

मुंबई: मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल रेल्वे रोज वेगळ्या वेगळ्या कारणांनी चर्चेत असते. त्यात नविन कारणाची भर पडली असुन मंगळवारी ट्रान्सहार्बर मार्गावर ठाण्याला जाणारी लोकल शेकडो प्रवाशांसह थेट सानपाडा कारशेडमध्ये पोहोचली आणि एकच गोंधळ उडाला.

वाशी ते ठाणे या ट्रान्सहार्बर मार्गावरून धावणारी लोकल वाशीवरून निघाल्यानंतर ठाण्याच्या दिशेने जाण्या ऐवजी तांत्रिक बिघाड झाल्याने ही लोकल प्रवाशांसह थेट सानपाडा कारशेडमध्ये वळवण्यात आली. लोकल ठाण्याऐवजी सानपाडा कारशेडच्या दिशेला वळवल्याने प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. लोकलमध्ये नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला हे स्पष्ट झाले नसले तरी लोकल मधील प्रवाशांमध्ये भिती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.