युतीकडे ‘महाराष्ट्र क्रांती सेनेची’ विधानसभेच्या 10 जागांची मागणी

कोल्हापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या विधानसभेसाठी ‘महाराष्ट्र क्रांती सेनेला’ युतीतील घटक पक्ष म्हणून घोषीत केले आहे. महाराष्ट्र क्रांती सेनेचे पक्ष प्रमुख सुरेशदादा पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे येत्या विधानसभेसाठी दहा जागांची मागणी केली असल्याची माहिती, महाराष्ट्र क्रांती सेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख भरत पाटील यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत दिली.

मागणी कारावयाच्या मतदार संघांविषयी चर्चा आणि पक्ष वाढीसाठी करावयाच्या कामांसाठी 28 जून रोजी ‘कोल्हापूर विभागीय मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास पक्षप्रमुख सुरेशदादा पाटील, कार्याध्यक्ष चंद्रकांत भराट, प्रवक्ते विजयसिंह महाडिक, मराठवाडा विभाग प्रमुख रामजीवन बोंदर, राज्य कार्यकारणी सदस्य राजू सावंत, यांसह सांगली, सातारा, सोलापूर विभागातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, महिला व युवती प्रमुख, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.