कंगना राणावतच्या “थलायवी’ची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. करोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन लागू केल्यामुळे “थलायवी’ची रिलीज डेट बऱ्याचवेळेला पुढे ढकलली गेली आहे. मध्यंतरी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचीही चर्चा सुरू झाली होती, पण निर्मात्यांच्या या प्रस्तावाला कंगनाने जोरदार विरोध केला होता.
आता “थलायवी’ची नवीन रिलीज डेट समजली आहे. “थलायवी’ 10 सप्टेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे, असे कंगनाने म्हटले आहे. आता तर कंगनाने या सिनेमाचे स्पेलिंगदेखील बदलले आहे.
तिने मूळ स्पेलिंगला आणखीन एक जास्तीचा “आय’ जोडला आहे. मात्र, यामागील नेमके कारण समजू शकलेले नाही. कदाचित न्यूमरॉलॉजीचे कारण असण्याची शक्यता आहे. “थलायवी’ एकाचवेळी अनेक भारतीय भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे.
कंगनाने आपल्या “धाकड’ या आगामी सिनेमाचे शूटिंग संपवले आहे आणि “तेजस’ची तयारी सुरू केली आहे. या सिनेमांमध्ये कंगनाचा एक स्पेशल लूक प्रेक्षकांना पाहता येणार आहे