अन्‌ अमिताभ बच्चन यांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

बॉलीवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत अनेक दशकांपासून आपला ठसा कायम ठेवला आहे. त्यांनी प्रत्येक सुपरहिट दिग्दर्शक आणि कलाकारांसह काम केले आहे. तसेच अमिताभ बच्चन यांच्याकडे अनेक दिग्गज डायरेक्‍टर्सची लाइन लागलेली असते.

परंतु एक असा प्रसंग आला होता जेव्हा अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर तो चित्रपट विनामोबदला करण्याचे ठरविले. तो चित्रपट म्हणजे संजय लीला भंसाली यांचा “ब्लॅक’ चित्रपटासाठी बीग बीने कोणतेही मानधन घेतले नाही. याबाबत खुद्द त्यांनी स्वतः माहिती दिली होती. बिग बी म्हणाले होते की, ते कायमच संजय लीला भंसाली यांच्यासोबत काम करू इच्छित होते.

ज्यावेळी भंसाली यांनी आपल्या दिग्दर्शनाखालील “ब्लॅक’ चित्रपटसाठी त्यांना ऑफर दिली तेव्हा त्यांनी एक कोरा पैसादेखील घेतला नाही. “ब्लॅक’ला समर्पित एका विशेष ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी याचा उल्लेख केला होता. या चित्रपटात अमिताभसोबत राणी मुखर्जीने मुख्य भूमिका साकारली होती.

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच चित्रपटाला सर्वश्रेष्ठ चित्रपटासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.