पुणे – पुण्यातील श्रावणी भार्गव ही तरुणी 28 जानेवारी रोजी दूंदीगल- हैद्राबाद येथील एअरफोर्स ऍकॅडमी येथे प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहे. या प्रशिक्षणानंतर श्रावणी यांना “फ्लाइंग ऑफिसर’ या रॅंकमध्ये कमिशन करण्यात येणार आहे. त्यांनी एएफएसबी मुलाखतीचे मार्गदर्शन पुण्यात घेतले आहे.
श्रावणी यांचे शालेय शिक्षण ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतून झाले असून, त्यानंतर 12 वी पर्यंतचे शिक्षण मॉडर्न महाविद्यालय आणि त्यापुढील शिक्षण गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स येथे घेतले आहे.
यासह त्या सी.ए. (इंटरमीडिएट) ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून, सध्या अंतिम वर्षाचा अभ्यास करतात. त्यांचे वडील संजीव भार्गव हे रेल्वेमध्ये कार्यरत असून, आई गृहिणी आहे.