मुंबई – सध्या सुरू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेसन गाजतय ते आरोपप्रत्यारोपांमुळे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात पेन-ड्राईव्ह सादर करून धुरळा उडवून दिला होता. तसेच मुद्दसीर लांबे यांच्याविषयीही नवाब मलिक यांच्यावर आरोप केले होते. त्यावर आता अजित पवारांनी स्पष्टीकरण देत फडणवीसांच्या पेन-ड्राईव्हची हवा काढली आहे.
फडणवीसांनी सभागृहात दिलेल्या पेनड्राईव्हबाबत म्हटलं की, यात एक ऑडिओ क्लिप आहे. डॉ. मुद्दस्सिर लांबे यांचे संबंध दाऊदशी असून डॉ. मुद्दस्सिर लांबे आणि अर्शद खान यांच्यातील संभाषणाचा हा ऑडिओ असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉ लांबे यांना राज्य सरकारने वक्फ बोर्डवर घेतलं आहे. मात्र एका सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेने त्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली आहे, असंही फडणवीस म्हणाले होते.
दरम्यान ‘मुद्दास्सीर लांबे या सदस्यांची निवडणूक 31-08-2019 ला फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळी झाली होती’ असं पुराव्यानिशी सांगत अजित पवारांनी फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बमधून हवाच काढून घेतली.
राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी निधी वाटपावरून टीका केली होती. आज अजित पवारांनी याला उत्तर देत विरोधकांवर जोरदार हल्लबोल केला. मुद्दास्सीर लांबे या सदस्यांची निवडणूक 31-08-2019 ला फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळी झाली होती. नियुक्ती करताना 12 सदस्य असतात.
मागच्या सरकारमध्ये शिवसेना सुद्धा होती. पण मागच्या सरकारमध्ये त्यांना किती अधिकार होते हे माहिती आहेच. त्यामुळे यात तथ्य नाही, असं म्हणत अजित पवारांनी फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.