बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. ती आपल्या हॉट ऍण्ड बोल्ड फोटोमुळे इंटरनेटवर प्रसिद्धीच्या झोतात असते. अनन्याने नुकतेच एका मॅगझीनसाठी ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोत अनन्या पांडे ब्लॅक कलरच्या लेदर ब्रालेटसह शॉर्ट स्कर्टमध्ये खूपच स्टनिंग दिसून येत आहे.
यातील पहिल्या फोटोत अनन्या एक कोल्ड बोल्ड पोज देताना दिसत आहे. या लुकमध्ये ती बिकिनी टॉप, मरून ट्राउजरमध्ये खूपच हॉट अंदाजात दिसते. या फोटोशूटमध्ये अनन्या नीडर असल्याचे दिसून येत आहे.
अनन्याने आपल्या सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले असून, असंख्य चाहत्यांनी कमेंट्स करत अनन्याचे कौतुक केले आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अनन्या लवकरच पॅन इंडिया चित्रपट असलेल्या “लिगर’मध्ये विजय देवरकोंडासह झळकणार आहे. याशिवाय ती शकुन बत्राच्या आगामी चित्रपटात काम करणार आहे.