पुणे – लावणी क्विन म्हणून ओळखली जाणाऱ्या गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यतेचे चित्र दिसत आहे. तिच्या कार्यक्रमांवर महाराष्ट्रात बंदी घालावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्र विकास सेनेच्या वतीने युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांनी हे निवेदन पोलिसांना दिले होते. तसेच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचा अनेक लोकांनी विरोध केला आहे.
अशातच मराठवाडा संघटक नितीन मुजमुले यांचा पाठिंबा मिळाला आहे. शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणून गौतमीला विरोध, आयोजक सचिन लोखंडे यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे. आष्टीत कुठलाही गालबोट लागलं नाही, गौतमीचा नृत्यात कुठेही बीभत्सपणा नाही, आज आष्टीत महिलांची मोठी गर्दी होती. असं म्हणत त्यांनी कार्यक्रमाचा विरोध करणाऱ्यांना प्रतिउत्तर दिले आहे. 1 तारखेला जामखेडमध्ये गौतमीचा पुन्हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .
दरम्यान, मिरजेच्या बेडग या ठिकाणी देखील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळाचा प्रकार घडला होता. त्यामुळे गौतमी पाटील हिच्या महाराष्ट्रातील लावणी कार्यक्रमांवर बंदी आणावी, अशी मागणी राष्ट्र विकास सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.