Baraskar Maharaj allegations on Manoj Jarange : मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर मराठा आंदोलनात फूट पडल्याचे चित्र आहे. यातच अजय महाराज बारसकरांनी जरांगेंवर याआधी आरोप केले. त्यांना जरांगेंकडून उत्तर देण्यात आले.
त्यानंतर आज पुन्हा एकदा बारसकरविरुद्ध जरांगे यांच्यातील संघर्षाचा दुसरा अंक सुरू झाला असून, दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अजय महाराज बारसकर म्हणाले, मी मराठा समाजाचा आहे. तरीही माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले. | Baraskar Maharaj Manoj Jarange
जरांगेंनी तुकाराम महाराजाची माफी मागितली, पण तीसुद्धा अंहकाराने. त्यांना दुसऱ्या दिवशी माझ्याबदद्ल विचारले. तर ते काय म्हणाले की, तो काय महाराज आहे का? बांधावर आला आणि महाराज झाला. त्याने बलात्कार केला, विनयभंग केला असे आरोप जरांगेंनी केले. मात्र या आरोपाला कुठलेच पुरावे नाहीत, असे बारसकर यावेळी म्हणाले.
जरांगेंनी माझ्यावर आरोप केला की, मी तिनशे कोटी रुपयांची माया जमा केली आहे. एवढ्या मोठ्या उंचीवरच्या आंदोलनकर्त्याने एवढा मोठा आरोप करणे चुकीचे असल्याचेही बारसकर यांनी सांगितले. | Baraskar Maharaj Manoj Jarange
जरांगेवर केले गंभीर आरोप
“मी तुला कसले प्रश्न विचारले ? मी त्याला वैयक्तिक प्रश्न विचारले का ? मागे 17 दिवसांचं आंदोलन झालं तेव्हा तू रात्री कुणाच्या घरात दूध-भात खात होता ? माझ्याकडे रेकॉर्ड नाही का ? माझ्याकडे पुरावे नाहीत ? कोणत्या मायमाउलीकडून तू कंबरेपर्यंत पाय दाबून घेतले, माझ्याकडे पुरावे नाहीत ? माझ्याकडे व्हिडीओ आणि रेकॉर्डींग आहेत. कोणत्या माता-माऊलीला तू आंबडचा आमदार बनवण्याचा शब्द दिलाय ? जरांगे मला माहिती आहे. पण आमची ती संस्कृती नाही. आम्ही सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला. डील काय झाली ते आम्हाला माहिती आहे” असं अजय महाराज बारसकर पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले. | Baraskar Maharaj Manoj Jarange