मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृती दिनानिमित्त एक खास पोस्ट केली आहे. “वंदनीय गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन” अशा कॅप्शनखाली सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांनी ही पोस्ट केली आहे. यासोबतच एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघेंचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या फोटोसह काही मजकूर देखील लिहिला आहे. “उरात भरुनी सदैव आपले स्मरन, मनामध्ये कोरली आहे कायम आपलीच शिकवण…करीतो गुरुवर्य आपल्या तत्वांचे आचरण,जनसेवेचे व्रत महत्त्वाचे, नाही राजकारण…” अशा आशयाचा हा मजकूर यावेळी लिहलेला दिसून येतो.
वंदनीय गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन…. pic.twitter.com/S5UoEXUW7Z
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 26, 2022
काही महिन्यांपूर्वीच धर्मीवर आनंद दिघे यांच्यावर चित्रित केलेला चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील नात्याचे दर्शन ठाण्याबाहेरील महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना पाहायला मिळाले होते. यातूनच शिंदे यांचे दिंघेनसोबत भावनिक नाते असत्याचे उघड झाले होते.