मुंबई – हॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडियन निक कॅननच्या आयुष्यात आणखी एक मूल येणार आहे. याचा खुलासा खुद्द अभिनेत्याने सोशल मीडियावर केला आहे. 41 वर्षीय निकचे हे 9 वे अपत्य आहे.
मॉडेल ब्रिटनी बेलसह निक कॅननचे हे तिसरे अपत्य आहे. अभिनेत्याने इंस्टाग्रामवर ब्रिटनीच्या मॅटर्निटी फोटोशूटचा व्हिडिओ शेअर केला आहे. या मॉन्टेज व्हिडिओमध्ये निक कॅनन आणि मॉडेल ब्रिटनी बेल रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. ब्रिटनी न्यूड अवस्थेत तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. त्याचवेळी निक तिला मिठी मारताना आणि रोमँटिक होताना दिसत आहे. त्याच व्हिडिओमध्ये ब्रिटनी बेल आणि निक कॅनन देखील त्यांच्या इतर दोन मुलांसोबत पोज देताना दिसत आहेत. या व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सने संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. एका युजर्सने,”भाऊ थांबा..” म्हणत कॉमेंट केली आहे.
View this post on Instagram
निक आणि ब्रिटनी यांना दोन मुले आहेत. गोल्डन सायगॉन नावाचा 5 वर्षांचा मुलगा. आणि पॉवरफुल क्वीन नावाची 19 महिन्यांची मुलगी आहे. 2021 च्या अखेरीस, निक कॅननने सांगितले होते की तो काही काळ ब्रह्मचर्य स्वीकारत आहे. यानंतर, जानेवारी 2022 मध्ये, त्याने जाहीर केले की तो मॉडेल ब्रे टायसीसह एका मुलाचा पिता होणार आहे.