Amol Mitkari on Chandrashekhar Bawankule | राज्यातील राजकारण हे महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून तापलेले असतना आता विरोधकांना पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना वेठीस धरण्यास मुद्दा मिळाला आहे. कारण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज नागपुरमध्ये संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी एक मोठं विधान केल्याने आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. “मी प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत”, अशा शब्दांत बावनकुळे यांनी आपली भावना व्यक्त केली होती. त्यांच्या याच वक्तव्यवरुन विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचण्यास सुरुवात केली आहे.
बावनकुळे म्हणतात, ‘…तोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत’
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी म्हटले की,”बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ अत्यंत सोपा आहे. कारण काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी देखील एका सभेत बोलताना म्हटले होते की, देवेंद्र फडणवीस हेच आमचे खरे मुख्यमंत्री आहेत.”
बावनकुळे म्हणतात, ‘…तोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत’
“त्याचबरोबर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काही दिवसांपूर्वी बोलताना ‘महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय देवेंद्र फडणवीस’ असा उल्लेख केला होता. एकनाथ शिंदे आणि शिंदे गट हा भाजपाला शरण गेला आहे आणि भाजपाच्या मनात जे आहे की देवेंद्र फडणवीसांनीच नेतृत्व करावं, याचा अर्थ ते एकनाथ शिंदेंना कवडीचीही किंमत देत नाहीत. चंद्रशेखऱ बावनकुळेंचं वक्तव्याचा गांभीर्याने विचार शिंदे गटाने आणि महाराष्ट्राने केला पाहिजे.” असेही मिटकरी यांनी म्हटले आहे.
“उद्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे, आणि अशा वेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट आहे. कारण भाजपाला एकनाथ शिंदे यांचं नेतृत्वच मान्य नाह. त्यामुळे लवकरच एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचा राजकीय गेम करून, देवेद्र फडणवीसांना ते परत त्या ठिकाणी सत्तारूढ करण्यासाठी आसूसलेले आहेत.” अशा शब्दांत मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली.
एकनाथराव शिंदे साहेब आता तरी जागे व्हा, दस्तुर खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे, अर्थ साधा सोपा तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही !जागे व्हा !!@mieknathshinde
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 18, 2022
एकनाथराव शिंदे साहेब आता तरी जागे व्हा, दस्तुर खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे, अर्थ साधा सोपा तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही. जागे व्हा, असेही मिटकरी यांनी म्हटले आहे. ( amol mitkari on chandrashekhar bawankule )