Kolhapur Accident – कोल्हापूरमध्ये (Kolhapur) मद्यधुंद अवस्थेत कार चालकाने (drunk car driver) सात वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत.
ही घटना कोल्हापुरातील कसबा बावडा ते सीपीआर चौककडे जाणाऱ्या रोडवरील महावीर कॉलजे समोर घडली. या अपघातानंतर जमावाने मद्यधुंद चालकाला बेदम मारहाण केली.
मद्यधुंद कार चालकाचे नाव ऋषिकेश कोतेकर (वय 29) असून तो कसबा-बावडा येथून सीपीआर रुग्णालयाच्या दिशेने येत असताना त्याने भरधाव वेगाने रमणमळा ते मेरी वेदर मैदानादरम्यान दोन दुचाकींना धडक दिली. यानंतर ही कारचालक न थांबता वेगाने महावीर कॉलेज चौकात आला.
यावेळी बॅडमिंटन खेळून वरुण रवी कोरडे (वय 22) खेळाडू हा त्यांच्या दुचाकीवरून घरच्या दिशेने येत होता. त्यावेळी ऋषिकेश कोतेकर यांच्या कारच्या धकडेत वरुण रस्त्यावर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
या धडकेनंतर कार चालकाचे त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि कार विरुद्ध दिशेने येत असल्याचे दोन कार आणि पाच दुचाकींना चिरडले. यासंपूर्ण प्रकार रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास घडला.