नवी दिल्ली – राफेल विमान गैरव्यवहार प्रकरणाची फ्रांस सरकारने स्वतंत्र न्यायाधिशांकरवी चौकशी करण्याची घोषणा केल्यानंतर कॉंग्रेसने पुन्हा हा विषय जोरदारपणाने लावून धरला आहे.
या संबंधात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तर ट्विटरवर एक ऑनलाईन सर्व्हेच घेतला आहे. त्यांनी मोदी सरकार राफेलची जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समिती चौकशी का टाळत असावे असा प्रश्न उपस्थित केला आहे.
या प्रश्नावर त्यांनी लोकांची ऑनलाईन उत्तरे मागवली आहेत. या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यांनी चार पर्याय दिले आहेत. सरकारला लाज वाटत असेल, त्यांना त्यांच्या मित्रांना वाचवायचे असेल, राज्यसभा सीटची ऑफर देऊन जेपीसी चौकशी फिरवण्याची तरतूद नाहीं म्हणून असेल किंवा हे सर्वच पर्याय बरोबर आहेत असे चार पर्याय त्यांनी यात दिले आहेत.
यापैकी एक पर्याय निवडून नागरीकांनी आपले मत नोंदवावे असे आवाहन त्यांनी केले आहे.