सासवड -पुरंदर तालुक्यातील करोना रुग्णांची आता वाढ होताना दिसत आहे. आज (मंगळवारी) एकूण 82 स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यातील 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता पुरंदर तालुक्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 597 झाली आहे.
सासवड शहरात 279 रुग्ण सापडले आहेत. तालुक्यात 25 जणांचा मृत्यू झाला असून 392 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 180 जणांवर उपचार सुरू आहेत.
आज सासवड 14, पारगाव 1 जेजुरी 3, भिवरी 1, नीरा 3, वाल्हे 8, बोपगाव, जेजुरी व काळेवाडी प्रत्येकी 1 असे पॉझिटिव्ह आहेत, अशी माहिती तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.