मुंबई – अदा शर्मा ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे भारावून गेली आहे. सुदीप्तो सेन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटावरून देशभरात वाद सुरू झाला होता. अजूनही चित्रपटाबाबत सोशल मीडियावर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच जगभरात शंभर कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि लवकरच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरही शंभर कोटी क्लबमध्ये सामील होणार आहे.
आतापर्यंत द केरळ स्टोरीने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत आणि बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड बनवले आहे. अनेक राज्यांमध्ये बंदी आणि चित्रपटाच्या विरोधात निषेध असूनही, केरला स्टोरी आधीच बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. यासाठी अभिनेत्री अदा शर्माने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तिने चित्रपट सुपरहिट होण्याला प्रेक्षकांचा सपोर्ट कारभूत असल्याचे म्हंटले आहे.
केरला स्टोरीचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपट देशभर चर्चेत होता. काही ठिकाणी या चित्रपटाविरोधात जोरदार निदर्शने देखील झाली. मात्र असं असूनही चित्रपटाने अनेक ठिकाणी हाऊसफूलचा बोर्ड झळकावला. अशात चित्रपटाने शंभर कोटींचा गल्ला कमावल्यानंतर सर्वच टीम मेंबर्सने याबाबत आनंद व्यक्त करायला सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
आदाने चित्रपटातील एक फोटो शेअर केला आणि एक पोस्ट लिहिली, ज्यामध्ये ती म्हणते, “बदनामी..चेष्टा करणे, धमक्या देणे, आमच्या टीझरचा निषेध करणे, काही राज्यांमध्ये चित्रपटावर बंदी घालणे, निंदा मोहीम सुरू करण्यात आली. पण तुम्ही, प्रेक्षकांनी, पहिल्याच आठवड्यात द केरला स्टोरी हा रिलीजपैकी नंबर 1 चित्रपट बनवला.” वाव.. हा प्रेक्षकांचा विजय आहे. “