इंदूर – भारतीय संघाने मंगळवारी श्रीलंकेचा पराभव करत टी-20 सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली. मात्र, या विजयापेक्षाही भारतीय कर्णधार विराट कोहलीने हरभजनसिंग याच्या गोलंदाजीची नक्कल सरावादरम्यान केल्याचीच जास्त चर्चा झाली.
कोहलीच्या नक्कलेचा संदेश सोशल मिडियावर प्रचंड गाजत आहे. विशेष म्हणजे कोहलीने सरावादरम्यान जेव्हा ही नक्कल केली त्यावेळी खुद्द हरभजनसिंग तेथे उपस्थित होता व त्याने दिलदारपणे कोहलीच्या निरीक्षणशक्तीचे कौतुक केले.
खेळाडूंचा सराव सुरू असताना कोहलीने गोलंदाजीसाठी हातात चेंडू घेऊन हरभजनच्या शैलीची नक्कल केली.
Who was @imVkohli imitating here?
Wrong answers only in the replies, GO!Watch more funny outtakes only on #Nerolac #CricketLIVE, on Star Sports & Hotstar!#INDvSL pic.twitter.com/IXD1j4xEKU
— Star Sports (@StarSportsIndia) January 7, 2020
कोहलीबरोबर धमाल करताना हरभजननेही त्याच्यासोबत नेटमध्ये गोलंदाजी केली व उपस्थितांनी दोघांचेही टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात कौतुक केले.