मुंबई – टीम इंडियाचा माजी गोलंदाज आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणी जावो अथवा न जावो, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नक्कीच येणार असल्याचे भज्जीने म्हंटले आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, “आमचे भाग्य आहे की हे मंदिर बांधले जात आहे, अशा परिस्थितीत आपण सर्वांनी तिथे जाऊन आशीर्वाद घेतले पाहिजेत. कोणी जावो अथवा न जावो, मी नक्कीच जाईन.” “कोणता पक्ष गेला आणि कोणता गेला नाही, याची मला पर्वा नाही, मी नक्की जाणार. जर कोणाला माझ्या राम मंदिरात जाण्यात अडचण असेल, तर त्याने हवे ते करावे”
भज्जी पुढे म्हणाला, “२२ जानेवारीला राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तिथे जाऊन किंवा टीव्हीच्या माध्यमातून लोकांनी रामाचा आशीर्वाद नक्कीच घ्यावा. हा दिवस खूप ऐतिहासिक आहे. होय. भगवान रामजी हे आपल्या सर्वांचे आहेत आणि त्यांच्या जन्मस्थानी मंदिर बांधले जात आहे, यापेक्षा मोठे काय असू शकते.मी तिथे नक्कीच जाईन.मी एक धार्मिक व्यक्ती आहे आणि प्रत्येक मंदिर,मशीद,गुरुद्वाराला हात जोडून जातो. ”
#WATCH | On opposition parties declining invitation to Ayodhya Ram Temple ‘Pran Pratishtha’ ceremony, former Cricketer and Rajya Sabha MP Harbhajan Singh says, ” It is our good fortune that this temple is being built at this time, so we all should go and get the blessings.… pic.twitter.com/YUAplDGMNk
— ANI (@ANI) January 19, 2024
22 जानेवारीनंतर केजरीवाल जाणार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, केजरीवाल सांगतात की, 22 जानेवारीनंतर ते संपूर्ण कुटुंबासह अयोध्येला रामलालाच्या दर्शनासाठी जातील.