पुणे – केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी अद्ययावतीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी व्होटर हेल्पलाइन ऍप उपलब्ध करून दिले आहे. या ऍपच्या माध्यमातून मतदारांना घरबसल्या मतदार यादीमधील चुका, पत्ता बदल आदी दुरुस्त्या मतदारांना करता येणार आहे.
व्होटर हेल्प लाइन ऍप हे प्ले स्टोअरमधून डाउनलोड करावे लागणार आहे. मतदार ओळखपत्रावरील ईपीआयसी क्रमांक अथवा मतदार यादीतील नाव शोधावे लागणार आहे. जर मतदारांना नावाच्या तपशीलात दुरुस्ती करावयाची असल्यास तसा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आला आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मोबाइल क्रमांक किंवा ई-मेल आयडीद्वारे नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी मतदारांकडे 10 अंकी ईपीआयसी क्रमांक असणे आवश्यक आहे. मतदार यादीतील तपशीलांमध्ये काही विसंगती असल्यास किंवा दुरुस्ती असल्यास त्याबाबत नवीन तपशील जोडून माहितीमध्ये दुरुस्ती करता येणार आहे.