नगर, (प्रतिनिधी) – शहरातील उड्डाणपूलावरून इंजिनिअरिंग काॅलेजच्या विद्यार्थ्याने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि.५) सायंकाळी उशिरा स्टेट बँक चौकात घडली. नामदेव पवार (पूर्ण नाव माहित नाही रा. गंगापूर) असे त्याचे नाव आहे.
तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. पवार हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील असून नगर शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात तिसर्या वर्षात शिक्षण घेतो. तो सोमवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास उड्डाणपुलावर गेल्या होता. त्याने स्टेट बँक चौकात उड्डाणपूलावरून उडी मारली.
यात तो गंभीर जखमी झाला. याची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पवार याने आत्महत्येचा प्रयत्न का केली या बाबत माहिती मिळू शकली नाही. पोलीस याबाबत चौकशी करत आहे.