नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर खेळाडूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कारवाई करावी, या मागणीसाठी भारतातील अनेक प्रसिद्ध आणि अव्वल कुस्तीपटू गेल्या महिन्याच्या २३ तारखेपासून निदर्शने करत आहेत. यामुळे संम्पूर्ण देशाचे याकडे लक्ष वेधले गेले आहे.
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात जंतर-मंतर येथे निदर्शने करणारी भारताची अव्वल कुस्तीपटू विनेश फोगट हिने म्हटले आहे की, एका शक्तिशाली व्यक्तीच्या विरोधात उभे राहणे कठीण आहे. हा व्यक्ती बराच काळ. त्याच्या शक्ती आणि पदाचा गैरवापर करत राहिला. प्रथमच जंतरमंतर येथे आंदोलन सुरू करण्यापूर्वी कुस्तीपटूंनी एका अधिकाऱ्याची भेट घेतली होती, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही, असा खुलासा त्यांनी केला.
विनेश म्हणाली, ‘जंतरमंतरवर धरणे आंदोलनाच्या तीन-चार महिन्यांपूर्वी आम्ही एका अधिकार्याला भेटलो, महिला खेळाडूंचा लैंगिक छळ आणि मानसिक छळ कसा होतो, याविषयी आम्ही त्यांना सर्व काही सांगितले, जेव्हा कोणतीही कारवाई झाली नाही तेव्हा आम्ही धरणे आंदोलन सुरु केले.
विनेश फोगट यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावरही कारवाई न केल्याने आणि समिती स्थापन करून प्रकरण दडपल्याबद्दल निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ‘केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही आमचा विरोध संपवला आणि सर्व खेळाडूंनी त्यांना लैंगिक छळाबाबत सांगितले. मात्र समिती गठित करून तेथे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी कारवाई झाली नाही असा आरोप देखील यावेळी फोगाट यांनी केला.