नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रचार सभेतून थोडा वेळ काढत लहान मुलांसोबत दिलखुलास गप्पा केल्या आहेत. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे पंतप्रधान राज्यात प्रचार सभा घेत आहेत. आज कलबुर्गी येथे रॅलीदरम्यान त्यांनी लहान मुलांशी जरावेळ गप्पा मारल्या.पंतप्रधानांना समोर बघताच चिमुकली हरखुन गेली होती. मोदींनी सुरुवातीला हाताच्या बोटांचा खेळ केला. असं करुन दाखवा..तसं करुन दाखवा असं म्हणत तसंच मुलांना करायला लावलं. त्यानंतर त्यांनी कोण मोठं झाल्यानंतर काय बनणार? असे प्रश्न विचारले.
#WATCH | Karnataka: Prime Minister Narendra Modi had a light-hearted interaction with children in Kalaburagi earlier today, before the roadshow here. pic.twitter.com/HYOoei56xf
— ANI (@ANI) May 2, 2023
पंतप्रधानांचा हा व्हीडिओ व्हायरल होत आहे. एक मुलगा त्यांना म्हणतो, मला डॉक्टर व्हायचंय. दुसरा म्हणतो मला पोलिस व्हायचंय. त्यावर पंतप्रधानांनी कुणाला पंतप्रधान व्हायचं नाही का? असं विचारलं. त्यावर एकाने म्हटलं की, तुमच्यासारखं व्हावं, असं वाटतंय. त्यानंतर सगळ्यांनीच त्याचे कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे.
कलबुर्गी येथे आज पंतप्रधानांनी रोड शो केला. यावेळी त्यांनी मुलांशी संवाद साधला. हा व्हीडिओ व्हायरल होत आहे. कर्नाटकमध्ये सत्ताधारी पक्षाला संधी न देण्याचा प्रघात आहे. त्यामुळे यावेळी कर्नाटकचे लोक भाजपला नाकारणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळेच भाजपचे शीर्षस्थ नेते कर्नाटकात ठाण मांडून आहेत.