ऍमी जॅक्‍सनकडे गुडन्यूज

बॉलिवूड ऍक्‍ट्रेस आणि मॉडेल ऍमी जॅक्‍सनने आज इन्स्टाग्रामवर आपल्या प्रेग्नन्सीची घोषणा केली. ऍमी आणि तिचा नियोजित नवरा जॉर्ज पेनियोतो यांचे हे पहिलेच बाळ असणार आहे. जॉर्ज खूपच श्रीमंत उद्योगपती आहे. याच वर्षी 1 जानेवारीला त्यांचा साखरपुडा झाला होता. इंग्लंडमध्ये दरवर्षी 31 मार्चला “मदर्स डे’ साजरा केला जातो. त्याच दिवसाचे निमित्त साधून ऍमीने आपल्या फॅन्सला “आपल्याला मातृत्वाची चाहुल’ लागल्याचे सांगितले आहे.

ऍमीने इन्स्टाग्रामवर आपला अणि जॉर्जचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे. त्यामध्ये तिचे बेबी बम्प स्पष्ट दिसते आहे. “ही आनंदाची बातमी मला घराच्या छतावरून ओरडून सांगावीशी वाटते आहे. सगळ्यांना ही गुडन्यूज सांगण्यासाठी आजच्या इतका योग्य दिवस असूच शकणार नाही. ही गुडन्यूज ही की या जगात सर्वाधिक प्रिय असलेले माझे बाळ लवकरच या जगात येणार आहे.’ असे ऍमीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. ऍमी आणि जॉर्ज जवळपास 4 वर्षे डेटिंग करत होते. यवर्षी त्यांचा साखरपुडा झाला तेंव्हा ऍमीच्या फॅन्सला धक्काच बसला होता. पुढच्यावर्षी ग्रीसमध्ये हे दोघेजण लग्न करणार आहेत, असे समजले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.