मुंबई – लस्ट स्टोरीज नेटफ्लिक्सवर आली होती, तेव्हा ती तिच्या अनोख्या यूनिक कंटेंट आणि स्टार कास्टमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. या चित्रपटात चार वेगवेगळ्या कथांच्या मदतीने लैंगिक संबंधांबद्दलचे आकर्षण कसे सीमारेषा ओलांडते हे दाखवण्यात आले. या चित्रपटाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘लस्ट स्टोरीज २’ यामधील एका भागात मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष व तिलोत्तमा शोम यांच्या मुख्य भूमिका आहे. हा भाग अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने दिग्दर्शित केली आहे. याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे कोंकणाने दिग्दर्शित केलेल्या कथेची चांगलीच चर्चा होत आहे. अशात अमृता सुभाषने कोंकणासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अमृताने या पोस्टमध्ये कोंकणासोबतच्या तिचा रिलेशशीप बॉण्ड कसा हेही लिहिले आहे,’कोंकणा सेन शर्मा! या क्षेत्रात येण्याच्या आधीपासून मी तिला पाहत आले आहे. मिस्टर एंड मिसेस अय्यर पहिला आणि तिच्या प्रेमात पडले. तेव्हापासून तिच्याबरोबर काम करायचं स्वप्नं अखेर आयुष्यानं पुरं केलं. आत्ता लस्ट स्टोरीज तिनं दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचा भाग होताना जाणवलं, ती उत्तम अभिनेत्री आहे, दिग्दर्शिका आहे, त्याहूनही उत्तम माणूस आहे. मला नेहमीच प्रोजेक्ट्स पेक्षा माणसं महत्त्वाची वाटत आली आहेत. त्यामुळे एखादे प्रोजेक्ट खूप यशस्वी होऊनही जर त्या माणसांशी जुळलं नाही तर हिरमुसायला होतं.’ असं म्हणत अमृता सुभाषने कोंकणा सोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला आहे.