मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र अद्याप या दोघांनी त्यांच्या नात्याबाबत कोणताही खुलासा केला नाही. मात्र एका मुलाखतीत अनन्याने तिच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे.
नुकतेच एका मुलाखतीत अनन्याला आदित्यसोबतच्या डेटिंगच्या अफवांवर काही प्रश्न विचारण्यात आले. याबाबत तिने मोठा खुलासा केला आहे. अनन्या म्हणाली की, ‘माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना उत्सुकता असणे ही चांगली गोष्ट आहे, मी कोणाला डेट करत आहे याचा अंदाज लोकांनी लावला पाहिजे. पण मी लग्नासाठी अजून खूप लहान आहे. त्यामुळे माझा लग्नाबाबत कोणताही प्लॅन नाही.’ असा खुलासा तिने केला आहे.
हे दोघे अनेक बी-टाऊन पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले होते, ज्यानंतर त्यांच्या केमिस्ट्रीने साऱ्यांचे लक्ष वेधले. मात्र अनन्याला सध्या तिच्या डेटिंग जीवनापेक्षा तिच्या करिअरवर अधिक लक्ष द्यायचं असल्याचे तीच्या बोलण्यातून समोर येत आहे. यावेळी तिने ‘लिगर’ बॉक्स’ या चित्रपटावरही भाष्य केले. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही.
याबाबत तिने सांगितले की, ‘कोणत्याही चित्रपटात काम करणाऱ्या लोकांना चित्रपट किंवा शो बनवणे किती कठीण काम आहे हे माहीत असतं आणि त्यासाठी ते मन लावून मेहनत करतात. पण काही वेळा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडल्या नाहीत तर निराश होऊ नये. अपयशातून शिकून पुढच्या चित्रपटात अजून चांगले काम केले पाहिजे,’ अशी भावना तिने व्यक्त केली.
दरम्यान, ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ मधून अनन्या पांडेने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. लवकरच ती ‘ड्रीम गर्ल 2’ आयुष्मान खुरानासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच अनन्या ‘खो गये हम कहाँ’ यातही सिद्धांत चतुर्वेदीसोबत झळकणार आहे.