नागपुर – नागपुरात अभिरुप न्यायालयाचं आयोजन करण्यात आलं होत यावेळी अमृता फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. या कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांनी सध्याच्या राजकारनासह विविध गोष्टींवर चर्चा केली. अमृता फडणवीस यांना प्रश्नोत्तरांदरम्यान विचारण्यात आले की, “अमृताजी तुमच्या आईंनी, सासूबाईंनी तुम्ही करियरिस्ट आहात म्हणून सांगितलं. तसेच देवेंद्रजींनी एकदा म्हटलं होतं की माझ्यापेक्षा जास्त पैसे तर अमृता कमावते. खरं आहे का हे?” असं मुलाखत घेणाऱ्या अजेय गंपावार यांनी विचारलं.
यावर उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी आपली कमाई ही पतीपेक्षा अधिक असल्याचं मान्य केलं. “हो खरं आहे. कारण त्यांनी कधी पैसे कमवलेच नाही जीवनात. त्यांनी फक्त लोकसेवा केली,” असं अमृता यांनी या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं. सध्या या कार्यक्रमाचा विडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे,
दरम्यान या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. “महात्मा गांधी हे तेव्हाचे राष्ट्रपिता होते. मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता आहेत” असं अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या. यापूर्वीही पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीस यांनी मोदींना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख ‘राष्ट्रपिता’ असा केला होता.