श्रीनगर :- श्रीनगर शहरात प्रताप पार्क येथे बलिदान स्तंभ म्हणजेच शहीद स्मारक उभारले जाणार असून त्याची पायाभरणी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाली. यावेळी जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा हेही उपस्थित होते.
हे स्मारक लाल चौकाच्या परिसरात श्रीनगर स्मार्ट सिटी अंतर्गत उभारले जात असून देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पायाभरणीनंतर लगेचच शहा नायब राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या राजभवनात गेले. अमित शहा यांनी आज जम्मू-काश्मीरचे शेवटचे युवराज करण सिंह यांच्या निवासस्थानी म्हणजेच करण महलल येथेही भेट दिली.
दिल्लीला परत जाण्यापूर्वी शहा यांनी काही निवडक प्रतिनिधींची पोलिस गोल्फ कोर्स येथे भेटही घेतली.